मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये हरित ऊर्जेचा वापर वाढविणे आणि वीज खर्चात बचत साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालय आणि MAHAPREIT यांच्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या कराराअंतर्गत सौरऊर्जा, स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान, ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, ऊर्जा साठवण (Energy Storage) आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानांचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील वीज वापर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि इतर शासकीय संस्थांच्या इमारतींच्या छतांवर तसेच मोकळ्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. हे प्रकल्प RESCO (Renewable Energy Service Company) मॉडेलद्वारे राबवले जाणार असून, यासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी MAHAPREIT कडून सर्वेक्षण, तांत्रिक अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला जाईल. तर तंत्रशिक्षण संचालनालय संबंधित संस्थांची माहिती, समन्वय आणि प्रशासकीय मंजुरीसाठी सहकार्य करणार आहे.
यासोबतच सौरऊर्जा व नूतनीकरणीय तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन तांत्रिक अभ्यासक्रम विकसित करणे, कौशल्यविकासाला चालना देणे आणि NABL मान्यताप्राप्त अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळा उभारण्याचे कामही संयुक्तपणे करण्यात येणार आहे.केंद्र व राज्य शासनाच्या हरित ऊर्जा धोरणाशी सुसंगत असलेला हा करार तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाला गती देणारा ठरणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…