मुख्य बातम्या

राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात केला गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके): नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत 10वा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे आता अशोक खरातविरोधात नोंदवण्यात आले आहेत. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वावी पोलीस ठाण्यात अशोक खरात यानेच राजेंद्र जासूद आणि दिनेश परब विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. बनावट व्हिडीओ दाखवून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अशोक खरात विरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजेस्टिकचा व्यवसाय करण्यासाठी अवतार पूजा करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज कार घेतली. सन 2018 मध्ये MH 15 GL 8181 या नंबरची मर्सडीज बाबाला भेट दिली. अवतार पूजा करण्याआधी परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांची भ्रमंती करावी लागेल, तसे न केल्यास नागदेवता दंश करेल अशी अशोक खरात याने मृत्यूची भीती दाखवली. गुरूच्या सेवेचे कारण सांगून आणि मृत्यूची भीती घालून अमेरिकेत वैद्यकीय खर्च करण्यास भाग पाडले. अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी 29 लाख 81 हजार खर्च जासूद यांनी केला. 2018 पासून डिसेंबर 2025 पर्यत वेळोवेळी फसवणूक करून 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अवतार पूजेसाठी अधिक पैसे उकळण्यासाठी सुरवातीला टाळाटाळ करणाऱ्या भोंदू बाबाने 1 ऑक्टोबर 2018 ला रात्री 8 वाजता पूजेसाठी बोलावले. इशान्येश्वर मंदिराच्या मागील बाजूस अंधारात नेऊन इशानेश्वर महादेव नागाच्या रुपात दर्शन देतील, असे भासवून खोटा नाग दाखवून भीती दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

नागदेवताने दर्शन दिले आता पुढील 5 वर्षात 21 देशात जाऊन तिथला मातीला स्पर्श केल्यानंतरच लॉजेस्टिकचा व्यवसाय सुरू करायला सांगितले. मला 21 देशात नेले नाही तर नागदेवताचा कोप होईल, नागाचा दंश होऊन मृत्युची भीती दाखवली. मिरगाव येथील फार्म हाऊसच्या बांधकामसाठी 1 कोटी 11 लाख रुपये उकळले. नवीन वास्तूमध्ये तुर्कस्थानचे लाकूड व लोखंडाचे फर्निचर बसविण्यासाठी 49 लाख रुपयांची मागणी केली. इतर सागवानी फर्निचर बनविण्यासाठी 29 लाख रुपये, फार्म हाऊसमध्ये किचन बनविण्यासाठी 42 लाख 50 हजार रुपये उकळले. जासूद यांना भीती घालून भोंदू अशोक खरात याने पूजा विधीच्या नावाखाली युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश या देशांना भेट दिली. त्याआधी म्यानमार, ग्रीनलँडचा दौरा केला. ग्रीनलँडच्या हॉटेलमध्ये असताना कैलास मानसरोवरला स्वर्गाचे पहिले टोक आणि ग्रीनलँडला स्वर्गचे दुसरे टोक मानतात असे सांगून फरशीवर झोपून स्वर्गात जाण्याचा ड्रामा केला. आपली फसवणूक होते आहे हे लक्षात आल्यानंतर जासूद यांनी अशोक खरात कडे खर्च केलेले पैसे मागितले असता त्याने सिन्नरच्या वावी पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

अशोक खरात प्रकरण! शिरूरच्या राजकीय नेत्याला काही अटी शर्तीवर तात्पुरता जामीन, पण…

नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही…

सेक्स रॅकेट प्रकरणाने महाराष्ट्र हादरला; अशोक खरात अटकेत, SIT मार्फत सखोल चौकशी सुरू

शिरूरच्या राजकीय पुढाऱ्याकडून अशोक खरात अन् दोन आमदारांना आलिशान महागड्या गाड्यांची भेट…?

Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण…

नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी…

मुख्यमंत्री, उशीर झाला! नाशिक भोंदू बाबा प्रकरणात चौकशीची मागणी; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

भोंदूबाबा प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकर अडचणीत, दत्तात्रय भरणे यांची ठाम पाठराखण

खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

…अखेर त्या भोंदू बाबाचा पर्दाफाश छ. संभाजीनगरात अघोरी प्रकार उघड

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

1 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

1 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

1 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

1 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

1 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

1 दिवस ago