मुख्य बातम्या

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना, एका महिला डॉक्टरने भररस्त्यात प्रसूती करून त्या मायलेकीचे प्राण वाचवले आहेत.

शिरूर शहरातील जोशीवाडी येथील एक गरोदर महिला आज (शनिवार) सकाळी प्रसूती कळा सुरू झाल्याने शिरूर ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली होती. मात्र, रुग्णालयाच्या अगदी जवळ पोहोचली असतानाच तिला होणाऱ्या कळा असह्य झाल्या. वेदनेने विव्हळत भररस्त्यातच बसून राहिली. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच तिथे गर्दी जमली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काहींनी तातडीने जवळच असलेल्या डॉ. सुनीता पोटे यांना संपर्क साधला आणि मदतीसाठी बोलावले.

डॉ. पोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेची अवस्था पाहून रुग्णालयात हलवणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. जराही उशीर झाला असता, तर बाळ किंवा बाळंतीण यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. यामुळे डॉ. पोटे यांनी भररस्त्यातच प्रसूती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने रस्त्यावरच सर्व प्रक्रिया पार पाडली आणि काही मिनिटांच्या तणावानंतर अचानक तिथे एका नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज सुरू झाला.

डॉ. पोटे या बाळाला हातात घेऊन उभ्या राहिल्यानंतर उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. बाळाच्या आवाजाने रस्त्यावर आनंदाचे वातावरण पसरले. डॉ. सुनीता पोटे यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि कर्तव्याप्रति असलेली निष्ठा पाहून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?

शिरूर तालुक्यातील त्या गावचे आरोग्य केंद्र ठरतंय ‘मृत्यू केंद्र’ ; बेजबाबदार डॉक्टरांवर ग्रामस्थांचा संताप 

माझ्याकडे रुग्णांना गोळ्या औषधे घेण्यासाठी का पाठवत नाही म्हणत शिरूरमध्ये रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला

शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

12 मिनिटे ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

17 मिनिटे ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

20 मिनिटे ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

16 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

1 दिवस ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

1 दिवस ago