महाराष्ट्र

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर, मतदारसंघनिहाय ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केली आहे.

यासंदर्भात ॲड. कोंडविलकर यांनी आज मंत्रालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेत पत्र सादर केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिशिष्ट ४४ च्या प्रती सार्वजनिक केल्यास लोकांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होईल.

पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मतदानाच्या दिवशी नोंदवलेली आकडेवारी आणि त्यानंतर जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात काँग्रेससह इतर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही शंका उपस्थित केल्या असून, निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत ‘व्होट चोरी’चा नवीन पॅटर्न वापरण्यात आल्याची जनभावना तयार झाली असल्याचा दावा करत, या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी संबंधित परिशिष्ट तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे ॲड. कोंडविलकर यांनी म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago