महाराष्ट्र

वंदे मातरमच्या वादावरून भाजपवर सपकाळांचा निशाणा; ‘हिंदू-मुस्लीम वाद उकरण्याचे षडयंत्र’

मुंबई: देशातील राजकीय वातावरण बदलले असून जनता आता भाजपा-मोदी-शाह सरकारला प्रश्न विचारत आहे. त्यामुळे सरकार घाबरले असून सांगण्यासारखे काही नसल्याने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार साजीद खान पठाण यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अस्लम शेख, अमीन पटेल, आमदार शिरीष नाईक, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार एम. एम. शेख, वजाहत मिर्झा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंदे मातरम’वरून राजकीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

‘वंदे मातरम’च्या मुद्द्यावरून भाजपकडून सुरू असलेल्या राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहन सपकाळ यांनी केले. “वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यामध्ये काँग्रेसची भूमिका होती. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमची किती कडवी गायची याबाबत निर्णय झाला. काँग्रेसच्या अधिवेशनांमध्येही हे गीत गायले जाते,” असे ते म्हणाले.

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न झालेल्या भाजपाने काँग्रेसला राष्ट्रभक्ती शिकवण्याची गरज नाही, असा टोला लगावत समाजात वाद निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, हा डाव यशस्वी होणार नाही, असा दावा सपकाळ यांनी केला.

मोहब्बत की दुकान’ हाच काँग्रेसचा मार्ग

देशातील राजकीय परिस्थिती बदलली असली तरी काँग्रेसची संस्कृती बदला घेण्याची नसून ‘मोहब्बत की दुकान’ हाच पक्षाचा मार्ग आहे, असे सपकाळ म्हणाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा मार्ग सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

‘जेन-झी’च्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव : प्रतापगडी

खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या काही वर्षांपासून देश संकटातून जात असल्याचा दावा करत आता परिस्थिती बदलत असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली असून त्यांच्या आंदोलनांमुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे, असा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ‘छात्रों की गुंज’ अभियानाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले जात आहेत. पुण्यात २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही प्रतापगडी यांनी केला.

‘राहुल गांधींना कोणतीही शक्ती अडवू शकत नाही’

पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी करण्याचे आवाहन करताना प्रतापगडी यांनी राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा सरकारला दिला. ‘वंदे मातरम’च्या मुद्द्यावरून भाजप काँग्रेसला राष्ट्रभक्ती शिकवत असल्याची टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगला आणि इंग्रजांविरोधात संघर्ष केला. त्यामुळे भाजपच्या कोणत्या नेत्याने स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला, हे भाजपने सांगावे, असे आव्हान प्रतापगडी यांनी दिले. भाजपविरोधातील लढाई ही फॅसिस्ट शक्तींविरोधातील लढाई असल्याचे सांगत भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला.

२०२९ मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचे वडेट्टीवारांचे आवाहन

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. भाजपा सरकार देशाची लूट करत असून लोकशाही आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.

भाजपाचा खंबीरपणे मुकाबला राहुल गांधीच करू शकतात. देश वाचवण्यासाठी २०२९ मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्याशिवाय पर्याय नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. समाजाच्या गरजा तसेच स्वतःची…

1 तास ago

मुंबईत फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेण्याची संधी; जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मुंबई : जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड…

1 तास ago

उबाठाला मोठा धक्का! सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या…

1 तास ago

जुन्नरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई: जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीबाबत घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड…

1 तास ago

सीओईपीच्या शुल्क रचनेत सुधारणा; विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिक लाभ मिळणार

मुंबई : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क रचनेत सुधारणा…

2 तास ago

लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करून मान- पाठ आखडून जाते, ३ प्रकारचे स्ट्रेचिंग करा अंग मोकळं होईल

ज्यांना ८- ९ तास सतत लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करावं लागतं अशा तरुण पिढीला मान- पाठ-…

2 तास ago