महाराष्ट्र

मुंबईत फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेण्याची संधी; जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मुंबई : जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईनच्या वतीने ‘Advanced Photography (Outdoor)’ या सहा महिन्यांच्या फोटोग्राफी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. छायाचित्रण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच फोटोग्राफीची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या अभ्यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अशी आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने असून मंगळवार आणि गुरुवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत वर्ग घेण्यात येणार आहेत. अभ्यासक्रमासाठी २५ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन हे डि-नोव्हो श्रेणीअंतर्गत डीम्ड-टू-बी युनिव्हर्सिटी आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष छायाचित्रणाचा अनुभव मिळण्यासोबतच तांत्रिक कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ डिझाईन, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०२२-२५१७२१७५ या क्रमांकावर संपर्क करता येईल.

या वेळी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिम चॅटर्जी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे यांच्यासह संबंधित अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

9 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

9 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

9 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

9 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

10 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

20 तास ago