महाराष्ट्र

बकरी ईदपूर्वी राज्यभर गोवंश वाहतुकीवर विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

मुंबई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोमातेची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग, पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे.

राज्यातील सीमावर्ती भाग, प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर नाकाबंदी करून जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे तसेच प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का, याची पडताळणी केली जाईल.

“मोटार वाहन कायदा आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नियमबाह्य वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येतील,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.विशेष पथकांमार्फत अवैध कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा रोखण्यावर भर दिला जाणार असून, मोहिमेचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

15 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

1 दिवस ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

1 दिवस ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

2 दिवस ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

2 दिवस ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

2 दिवस ago