महाराष्ट्र

पोलीस भरतीला वार्षिक कॅलेंडरची दिशा; सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन

मुंबई: राज्यातील लाखो पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असलेल्या युवक-युवतींसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. विधानपरिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी पोलीस भरतीसाठी वार्षिक वेळापत्रक (Annual Calendar) जाहीर करण्याची मागणी केली असून, सरकारने त्याची सकारात्मक दखल घेत एमपीएससीच्या धर्तीवर पोलीस भरतीचे वार्षिक कॅलेंडर तयार करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

नियम ९३ अंतर्गत सूचना क्रमांक २६ द्वारे सत्यजीत तांबे यांनी राज्यातील पोलीस भरती तसेच इतर सरळसेवा पदभरतीसाठी निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याची आणि प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

सभागृहात बोलताना तांबे यांनी सांगितले की, राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील लाखो युवक-युवती अनेक वर्षे पोलीस भरतीसाठी मेहनत घेत आहेत. मात्र, भरतीचे निश्चित वेळापत्रक नसल्याने त्यांच्या अभ्यासाचे आणि तयारीचे नियोजन विस्कळीत होत असून विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होत आहे.

यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे तसेच तामिळनाडू आणि केरळ राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही वर्षाच्या सुरुवातीलाच पोलीस भरती आणि इतर भरती प्रक्रियांचे वेळापत्रक जाहीर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. सदस्यांच्या सूचनेनुसार सकारात्मक कार्यवाही केली जाईल आणि पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

सरकारच्या या भूमिकेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, भविष्यात भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

50 मिनिटे ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

3 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

3 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

3 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

19 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago