महाराष्ट्र

एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेला ब्रेक; राज्यातील १९१ तालुके अजूनही औद्योगिक विकासापासून वंचित; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील ‘एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५ पैकी तब्बल १९१ तालुके अजूनही औद्योगिक समूहाविना असल्याचा गंभीर मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत उपस्थित केला.

नियम ९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या सूचनेद्वारे तांबे यांनी एमआयडीसी नसलेल्या व औद्योगिक विकासापासून वंचित तालुक्यांमध्ये उद्योगांना चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना जवळपास दोन दशकांनंतरही प्रभावीपणे राबवली जात नसल्याची टीका केली.

केंद्र सरकारने २००९-१० मध्ये सुरू केलेली आणि राज्याने २०१३-१४ पासून स्वीकारलेली ‘एक तालुका – एक क्लस्टर’ योजना स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी होती. मात्र, सरकारने १२४ प्रकल्प कार्यान्वित झाल्याचा दावा केला असला तरी त्या प्रकल्पांची तालुकानिहाय यादी जाहीर करण्याची मागणी तांबे यांनी केली.

संगमनेरसारख्या एमआयडीसी नसलेल्या तालुक्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अशा भागात क्लस्टर उभारले असते तर स्थानिक उद्योगांना मोठी चालना मिळाली असती. उर्वरित तालुक्यांमध्ये योजना नेमकी कधी राबविणार आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार का, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात १८६ क्लस्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून त्यांची एकूण किंमत १,९१६.१५ कोटी रुपये असल्याची माहिती दिली. यापैकी १२४ प्रकल्प कार्यान्वित झाले असून राज्य व केंद्र सरकारकडून मिळून ९२६.६७ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. या प्रकल्पांमधून सुमारे ३० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.

प्रत्येक तालुक्यात क्लस्टर उभारता आले नसल्याची वस्तुस्थिती मान्य करत मंत्री सामंत यांनी अनुदान प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, लाभार्थ्यांचा स्वहिस्सा आणि यंत्रसामग्री आयातीतील विलंबामुळे काही प्रकल्प रखडल्याचे सांगितले. या अडचणी दूर करून ‘एक तालुका – एक क्लस्टर’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

4 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

4 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

4 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

20 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago