waghale-dindi-2026
शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे येथून न्यू वाघेश्वर पायी दिंडी सोहळा, वाघाळे यांचे बुधवारी (ता. ८) अत्यंत भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाच्या निनादात, भगव्या पताका फडकवत आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”च्या अखंड जयघोषात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
वाघाळे परिसरात सकाळपासून परिसरात रिमझिम पावसाची संततधार सुरू होती. रस्त्यांवर गाळाचे साम्राज्य निर्माण झाले असतानाही वारकऱ्यांच्या उत्साहात कोणतीही कमी जाणवली नाही. सकाळी अकरा वाजता श्री वाघेश्वर मंदिरात मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा व दिंडीचे प्रस्थान सोहळा पार पडला. यावेळी गावातील भाविक, वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडी प्रस्थानापूर्वी गावातील भजनी मंडळ तसेच आळंदीकर महाराज यांच्या सुश्राव्य भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. अभंग, गवळणी आणि विठ्ठलनामाच्या गजराने वातावरण अधिकच मंगलमय झाले. भजनानंतर वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, कलश आणि खांद्यावर भगव्या पताका घेऊन पारंपरिक वेशभूषेत नगरप्रदक्षिणा काढली. संपूर्ण गावातून दिंडीचा मार्ग भक्तीमय जयघोषांनी दुमदुमून गेला.
मृदुंगाच्या ठेक्यावर, टाळांच्या गजरात आणि हरीनामाच्या अखंड उच्चारात वारकरी भर पावसात नाचत, फुगड्या खेळत आणि विठ्ठलभक्तीचा आनंद लुटत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. वारकऱ्यांचा उत्साह, शिस्त आणि भक्तिभाव पाहून उपस्थित ग्रामस्थही भारावून गेले. दिंडीला निरोप देण्यासाठी गावातील अबालवृद्ध, महिला, युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून शुभेच्छा दिल्या, तर काहींनी विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात दिंडीला भावपूर्ण निरोप दिला.
वारकरी संप्रदायाची परंपरा, सामूहिक भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश जपणारा हा दिंडी सोहळा वाघाळे गावासाठी श्रद्धा, संस्कार आणि भक्तीचा अविस्मरणीय उत्सव ठरला.
Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस सामूहिकरित्या साजरा…
वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…
वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!
वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…
आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…