महाराष्ट्र

राज्य निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळण्यात अपयशी; निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनियाजी व राहुलजींवरील गुन्हे राजकीय सुडबुद्धीने

मुंबई: राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे. कोर्टाच्या निकालाने या निवडणुका पुढे ढकलल्या असे जर सांगितले जात असेल तर हा निकाल २२ नोव्हेंबरला आला होता मग ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ८ दिवस निवडणूक आयोग काय झोपा काढत होते काय? असा संतप्त सवाल करून निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळू शकत नाही. आयोगाचा भोंगळ कारभार सुरु आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास १० वर्षानंतर होत आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मात्र त्यातही गोंधळ निर्माण करण्यात आला. आधी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट केली, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ करण्यात आले. दुबार/तिबार नावे मतदार यादीत दाखवली, निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर कोर्टाने निर्देश दिल्याने अनेक नगरपंचायतीमधील भवितव्य टांगणीला लागले आहे आणि आता तर २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका स्थगित करून त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ३ तारखेच्या निकालाचा या निवडणुकावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे ३ तारखेचा निकालही २० तारखेच्या मतदानानंतरच जाहीर करावा. आपलेच नियमही आयोगाला पाळता येत नाहीत हा कसला आयोग? निवडणुका या निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण निवडणूक आयोगाचा मागील काही वर्षांतील कारभार पाहता आयोगाला निवडणुकाही व्यवस्थित घेता येत नाहीत, हे खेदाने म्हणावे लागते.

सोनियाजी व राहुलजींवर राजकीय सुडबुद्धीने गुन्हा…

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार राजकीय सुडबुद्धीतून केलेला आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह हे विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेता गैरवापर करत आहेत. नॅशनल हेरॉल्डचे प्रकरण निराधार व कपोल कल्पित आहे. यामध्ये अनेक चौकशा करण्यात आल्या पण काहीही ठोस नाही तरिही केवळ गांधी कुटुंबाला बदनाम करणे त्यांचा नाहक त्रास देणे यासाठी मोदी शाह सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचे राजकारण करत आहेत.

गांधी कुटुंबाचे देशासाठी मोठे योगदान आहे, त्याग व बलिदानाची परंपरा आहे. मोदी शाह यांच्या दडपशाही विरोधात लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम राहुलजी करत असल्याने अशी कारवाई केली जात आहे. काँग्रेस अशा कारवायांना भिक घालत नाही. मोदी शाह यांच्या सुडाच्या राजकारणाचा आम्ही धिक्कार करतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गुन्हे दाखल करणारे मोदी शाह यांचे सरकार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे का दाखल करत नाही, असा सवालही सपकाळ यांनी केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

17 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago