महाराष्ट्र

कृषी-विपणनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक सहकार्य गरजेचे; मंत्री जयकुमार रावल

मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या परिसंवादात ‘विकसित महाराष्ट्र 2047’ ची प्रभावी मांडणी

मुंबई: कृषी व विपणन व्यवस्थेचा वेगवान विकास साधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

फिलिपाईन्समधील मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या कृषी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विकासाचा दृष्टीकोन मांडत ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या संकल्पनेची प्रभावी मांडणी केली.

या परिसंवादात तिमोर-लेस्तेचे उपपंतप्रधान मारीनो आसानामी सबीनो लोपस, जपानचे कृषी, वन व मत्स्यव्यवसाय उपमंत्री योईची वाटानाबे, तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे यांच्यासह विविध देशांतील मान्यवर उपस्थित होते.

परिसंवादादरम्यान जागतिक कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने, शाश्वत अन्नप्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर सखोल चर्चा झाली. यावेळी रावल यांनी राज्यातील कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण, बाजारपेठेतील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असल्याचे सांगत, त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातही व्यापक सुधारणा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला आशियाई विकास बँकेच्या भारतातील संचालिका मिओ ओका, वरिष्ठ अधिकारी ताकेशी उएडा आणि क्रिशन रोतेला यांचीही उपस्थिती होती. या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट होण्यास सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, या दौऱ्यात महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पासाठी जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करण्यावर भर देण्यात येत असून, भविष्यातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेतला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

7 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

7 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

8 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

8 तास ago

डीजेच्या गोंगाटाविरोधात आवाज उठवणाऱ्या बापटांना मारहाण; नीलम गोऱ्हेंचा संताप

पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांना टीव्ही9…

8 तास ago

पुण्यात भाजप नगरसेविकेचा संताप अनावर; ठेकेदाराला थेट ‘जिवंत जाळण्याची’ धमकी!

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या…

9 तास ago