महाराष्ट्र

RTOतील कथित भ्रष्टाचारावर विधानसभेत गदारोळ; वडेट्टीवारांच्या मागणीनंतर संबंधित अधिकारी सक्तीच्या रजेवर

मुंबई: परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत चांगलाच गाजला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर परिवहन मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा सभागृहात केली.

वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले की, परिवहन खात्यात चौकशी सुरू असतानाही काही अधिकारी पुन्हा गैरव्यवहार करत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे चौकशी निष्पक्ष होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बदली करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावर उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, योगेश मोरे आणि मोटार वाहन निरीक्षक आनंद मोड यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल घेण्यात आली असून, या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देत, चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

1 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

1 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

1 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

17 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

2 दिवस ago