महाराष्ट्र

युद्धामुळे साखर निर्यात ठप्प; देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा होण्याची शक्यता

मुंबई: देशात सुरू असलेल्या साखर हंगामात मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता साखर उद्योगावर दिसू लागला आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली असून आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परिणाम झाल्याने साखर निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सुमारे १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या हंगामात देशभरात सुमारे २९५ ते ३०० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचा दर सुमारे ३,६०० ते ३,७०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे. मागील वर्षी हा दर सुमारे ४,५०० रुपयांपर्यंत गेला होता. त्या वेळी सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा कोटा दिला होता. मात्र प्रत्यक्षात सुमारे ८ लाख टन साखरेचीच निर्यात झाली होती. त्यानंतर काही साखर कारखान्यांना शेवटच्या टप्प्यात कमी दराने साखर विकावी लागली होती.

यावर्षी सरकारने साखर निर्यातीचा कोटा वाढवून २० लाख टन केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सुमारे चार लाख टन साखरेचीच निर्यात झाली असून करारांमुळे जास्तीत जास्त पाच लाख टन साखर निर्यात होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

देशातील साखरेचा वार्षिक खप पूर्वी सुमारे ३०० लाख टनांच्या आसपास होता. मात्र यावर्षी विक्रीचा कल पाहता एकूण खप सुमारे २७० लाख टनांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. पहिल्या सहा महिन्यांत सुमारे १३३ लाख टन साखर विक्री झाली आहे.

साखर क्षेत्रातील अभ्यासक दिलीप पाटील यांच्या मते, साखर उद्योगाला यंदा २० लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी असली तरी आतापर्यंत केवळ चार लाख टन साखरेचीच निर्यात झाली आहे. अगोदरच दर कमी होते, त्यात आता युद्धाच्या परिणामामुळे निर्यातीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी सांगितले की, मध्य आशिया परिसरातील तणाव आणि सुएझ कालव्यातील वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीला फटका बसत आहे.

ठळक मुद्दे :

देशातील अंदाजे साखर उत्पादन : २९५ ते ३०० लाख टन

अपेक्षित साखर निर्यात कोटा : २० लाख टन

आतापर्यंत झालेली निर्यात : सुमारे ४ लाख टन

करारांमुळे अपेक्षित निर्यात : जास्तीत जास्त ५ लाख टन

देशांतर्गत बाजारात राहणारी अतिरिक्त साखर : सुमारे १५ लाख टन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

11 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

11 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

11 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

16 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

17 तास ago