महाराष्ट्र

चारित्र्यावर संशयातून विवाहितेला जाळून केले ठार; पती-सासऱ्याची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

नागपूर: चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला अमानुष मारहाण करून रॉकेल टाकून जाळून ठार केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. घटनेची क्रूरता आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता न्यायालयाने दोघांचेही अपील फेटाळून लावले.

अमोल देशमुख (वय २८) आणि विजय देशमुख (वय ५३) अशी आरोपींची नावे असून ते यवतमाळ जिल्ह्यातील पोफळी, ता. उमरखेड येथील रहिवासी आहेत. मृत विवाहितेचे नाव छाया असे आहे. छायाचा २००९ मध्ये अमोल देशमुखसोबत विवाह झाला होता. सुरुवातीला दोन वर्षे छायाला चांगले वागवण्यात आले; मात्र त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.

१५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी छायाची हत्या करण्याच्या उद्देशाने आधी तिची बेदम मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबून रॉकेल टाकून आग लावली. छाया स्वतःला वाचविण्यासाठी प्रतिकार करत होती. या झटापटीत आरोपींचे कपडेही रॉकेलने ओले झाल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणात सत्र न्यायालयाने २ मार्च २०२१ रोजी दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने प्रकरणातील पुरावे व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचे अपील फेटाळून लावत सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago