महाराष्ट्र

गुंडगिरी करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करा, गायकवाडला पक्षतरी कसा पाठीशी घालतो

महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरण्याचा भाजपा व निवडणूक आयोगाचा प्रयत्न

नवी दिल्ली: आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांचा हा काही पहिल्याच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन मध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ताधारी आमदारांचा धुमाकूळ सुरू आहे आणि सरकारची पकड राहिलेली नाही. महायुतीच्या आमदारानी अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. संजय गायकवाड यांचे यापूर्वी फोन व्हायरल झाले होते. या माणसाला वाचाळवीर ही पदवी उपमुख्यमंत्री यांनी दिली होती. ते सातत्याने बेताल वक्तव्य करत असतात. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला १ लाख रुपये बक्षीस देऊ, फडणवीसांच्या तोंडात कोविडचे जंतु घाला, असे हा वाचाळवीर बोलला होता, हा विछिप्त व्यक्ती आहे. कँन्टीनवाल्याची काही चुक असेल तर सरकारकडे तक्रार करून त्याचे कंत्राट रद्द करा. विशेष म्हणजे हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकाखाली सुरु आहे. नेहमी रामशास्त्री प्रभुणे सारखा आव आणणाऱ्या फडणविसांनी जागे व्हावे व कारवाई करावी.

मराठीच्या नावाने गुंडागर्दी करणे चुकीचे..

राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शांततेच्या मार्गाने जात असतील तर राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठीच्या नावाने सुरू असलेली मारहाण, गुंडागर्दी काही पटणारी नाही. मराठी माणसानं संयम बाळागावा, आपली सहिष्णुती, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्म जागवावा.

महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये राबवण्याचा डाव.

राहुल गांधी यांनी आज बिहारमध्ये मोर्चा काढला त्यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झालेली आहे आणि ही मतचोरी लपवण्यासाठी सरकार व निवडणुक आयोग नियम बदलत आहेत. महाराष्ट्रातील तोच मतचोरीचा पॅटर्न आता बिहारमध्ये राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे व नंतर तोच पॅटर्न भाजपा सर्व देशात वापरू शकतो. लोकशाहीत निवडणुका ह्या निष्पक्षपाती झाल्या पाहिजेत पण निवडणुक आयोगच सत्ताधारी भाजपासाठी काम करत असल्याचे चित्र आहे, असे सपकाळ म्हणाले..

पुलवामा ते पहलगाम मोदींनी उत्तरे द्यावीत.

पुलवामा स्फोटाला सहा वर्ष झाली पण त्याचा अद्याप तपास झालेला नाही. ४० जवान शहीद झाले, ३०० किलो स्फोटके कुठून आली त्याचा तपास लागलेला नाही. हल्लेखोर सापडले नाहीत. आणि आता पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन निष्पाप २६ पर्यटकांना ठार करून अतिरेकी निवांत परत जातात. ते कूठून आले व कुठे गेले याचा तपास झालेला नाही. चुकीची रेखाचित्रे प्रसिद्ध करून जनतेची दिशाभूल केली. पुलवामा ते पहलगामची सर्व उत्तरे आजही अनुत्तरीतच आहेत असे सपकाळ म्हणाले.

गिरणी कामगारांच्या मोर्चावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, लोकांच्या मागण्या ऐकुन घेणे आणि त्याचा सहानुभूतीने विचार करणे गरजेच आहे. पण भाजपा सरकार कोणाशीच चर्चा करायला तयार नाही. त्यांना फक्त बिल्डर व उद्योगपतींशी चर्चा करण्यातच जास्त रस आहे. मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारने यातून बाहेर यावे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

20 वर्षांत 40 बदल्या! तुकाराम मुंढेंनाही मागे टाकणाऱ्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कारकीर्द

मुंबई: प्रशासकीय सेवेत प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा…

8 तास ago

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील;  सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…

16 तास ago

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…

16 तास ago

एका वर्षात हजारो सरकारी शाळा घटल्या; महाराष्ट्रातही ३५७ शाळांना फटका

नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची…

16 तास ago

महागाईचा भडका; घरखर्चाचे गणित कोलमडले! उत्पन्न जैसे थे, मात्र खर्चाचा आलेख वाढता

नाशिक : महागाईचा वाढता आलेख सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम करू लागला आहे. किराणा मालासह…

16 तास ago

NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद; १ कोटींहून अधिक नोंदणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common…

16 तास ago