मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक–खासगी भागीदारीला बळ
मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे अधिक प्रभावीपणे घडत असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टीसीएस फाउंडेशन यांचे या कार्यात मोलाचे योगदान लाभत आहे. वारसा जतनामध्ये खासगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग वाढावा, या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने चालना दिली आहे.
या धोरणांतर्गत राज्यातील ऐतिहासिक वास्तू आणि नैसर्गिक परिसंस्थांच्या संरक्षणासाठी सार्वजनिक–खासगी भागीदारीचा आदर्श निर्माण झाला असून, मुंबईतील अनेक महत्त्वाच्या वारसा वास्तूंना नवसंजीवनी मिळाली आहे.
राजाबाई टॉवर आणि ग्रंथालय इमारतीचे संवर्धन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून गेल्या दशकात मुंबई विद्यापीठातील ऐतिहासिक राजाबाई क्लॉक टॉवर आणि ग्रंथालय इमारतीच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला.
१५६ वर्षे जुन्या राजाबाई टॉवरच्या बाह्य प्रकाशव्यवस्थेचे आधुनिकीकरण तसेच ग्रंथालयातील फर्निचरची दुरुस्ती व पुनर्स्थापना या कामांना शासनाच्या पाठबळामुळे गती मिळाली.या प्रकल्पासाठी ‘टीसीएस’ने ८.९० कोटी रुपये योगदान दिले असून, या उपक्रमाची दखल घेत युनेस्कोने २०१८ च्या आशिया–पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांमध्ये गौरव केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला आंतरराष्ट्रीय मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक–खासगी भागीदारीतून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) यांच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरण प्रकल्पालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.या प्रकल्पासाठी ‘टीसीएस’ने टप्प्याटप्प्याने एकूण २४.७९ कोटी रुपये योगदान दिले आहे.
सन २०२२ मध्ये युनेस्कोच्या आशिया–पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ मिळवणारा हा प्रकल्प वास्तुशास्त्रीय व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून आदर्श ठरला. गेल्या १०० वर्षांतील वस्तुसंग्रहालयाचे हे पहिले मोठे पुनर्संचयितीकरण कार्य मानले जाते.
वारसा जतनात महाराष्ट्राचा आदर्श
सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी शासन आणि खासगी क्षेत्रातील समन्वयातून उभा राहिलेला हा उपक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरत असून, भविष्यातील वारसा संवर्धन प्रकल्पांसाठी तो एक आदर्श मॉडेल ठरत आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…