महाराष्ट्र

परीक्षा केंद्रावरील शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन, निलंबनाची कारवाई

संभाजीनगर: राज्यभरात दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त शिक्षकाने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीशी अयोग्य वर्तन करत तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्याने वारंवार फोन करून तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने धाडस दाखवत संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर संतप्त नातेवाईक परीक्षा केंद्रावर पोहोचले. संस्थाचालकांच्या उपस्थितीत शिक्षकाला जाब विचारण्यात आला. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, यावेळी संबंधित शिक्षकाने आपली चूक कबूल केली.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी आणि काही उपस्थितांनी संबंधित शिक्षकाला मारहाण केल्याची माहिती आहे. तसेच, या शिक्षकाने इतर विद्यार्थिनींनाही अशाच प्रकारे त्रास दिला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.

शिक्षक निलंबित; पुढील कारवाईकडे लक्ष

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने संबंधित शिक्षकाला तत्काळ निलंबित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी शिक्षण क्षेत्रात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

14 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

14 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago