महाराष्ट्र

ठाकरे शहांच्या विश्वासू शिलेदाराची भेट घेणार; शिंदेसेनेला अस्वस्थ करणाऱ्या लक्षवेधी घडामोडी

मुंबई: महायुती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अस्वस्थ असताना दिल्लीत लक्षवेधी घडामोडी सुरु आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महायुतीमध्ये लक्ष घालण्याची विनंती दोन्ही नेत्यांना केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीत असताना शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ठाकरे दिल्लीत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे भाजपच्या मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत.

उद्धव ठाकरे काल सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. त्यावेळी तिथे खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे कुटुंबीय उपस्थित होते. उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये सहभागी होत असताना आदित्य ठाकरे केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी कालच जहाजबांधणी विभागाचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. राज्यापाठोपाठ आता दिल्लीतही हेच चित्र दिसू लागलं आहे.

दिल्ली दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते भूपेंद्र यादव यांचीदेखील भेट घेणार आहेत. भूपेंद्र यादव पर्यावरण मंत्री आहेत. पर्यावरण आदित्य ठाकरेंचा आवडता विषय आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते पर्यावरण मंत्री राहिले आहेत. त्यांच्या वरळी मतदारसंघात पर्यावरणाशी संबंधित अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि भूपेंद्र यादव यांची भेट महत्त्वाची असेल.

भूपेंद्र यादव यांची राजकीय कारकीर्द पाहता आदित्य ठाकरेंची त्यांच्याशी होणारी भेट शिंदेसेनेची धडधड वाढवणारी आहे. भूपेंद्र यादव केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अतिशय जवळचे मानले जातात. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी यादव यांचं नाव स्पर्धेत आहे. विशेष म्हणजे भूपेंद्र यादव हे ठाकरे आणि पवार कुटुंबियांच्या जवळचे आहेत. दोन्ही कुटुंबांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यादव यांना राष्ट्रीय राजकारणात आलं. २०१९ मध्ये राज्याच्या राजकारणात नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. त्यावेळी भाजपनं यादव यांची नियुक्ती निरीक्षक म्हणून केलेली होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

27 मिनिटे ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

15 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

21 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

21 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

22 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

22 तास ago