मुंबई: दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाची स्थापना १ फेब्रुवारी १९४८रोजी झाली. ही संशोधन क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे जिचे २०२२-२३ हे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्याची सांगता १ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे.
यंदाचे वर्ष हे मुंबई मराठीग्रंथसंग्रहालयाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे! वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाअंतर्गत मराठी संशोधन मंडळाचे अमृतमहोत्सव सांगता सोहळा दिनी मंडळातील दुर्मीळ हस्तलिखांचे प्रदर्शन संदर्भ विभागात लावण्यात येत आहेत. तसेच ”मराठी संशोधन मंडळ आणि अ. का. प्रियोळकर’या विषयावर डाॅ. प्रदीप कर्णिक यांचे व्याख्यान गावस्कर सभागृहात (दि १) फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता आयोजित केले आहे.
त्याचवेळी प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात येईल. तरी या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय चे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे व मराठी संशोधन मंडळाचे संचालक डॉ नीतिन रिंढे यांनी केले आहे. दुर्मीळ हस्तलिखितांचे प्रदर्शन १ ते ४ फेब्रुवारी पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी६ या वेळेत खुले आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…