महाराष्ट्र

वातावरण तापले! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर

मंगळवेढा: मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नावरून मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांचे मौन समाज बांधवांना चांगलेच जाणवू लागले आहे. निवडणुका आल्या की ‘एक गठ्ठा मतांसाठी’ मराठा समाजाची आठवण काढणारे हेच नेते, आरक्षणासारख्या अस्मितेच्या प्रश्नावर मात्र अचानक ‘बहिरे’ का झाले आहेत. हा प्रश्न आता समाजामध्ये थेट विचारला जातो आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेला आरक्षणाचा लढा हा आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात पोहोचला आहे. समाजातील कार्यकर्ते खेड्यापाड्यात घोंगडी बैठका घेऊन लोकजागृती करत आहेत. मात्र, मंगळवेढ्यातील राजकीय नेते मात्र जणू “या आगीतून हात भाजून घेऊ नये” अशा भूमिकेत असल्याचे चित्र दिसते. याआधी निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी या नेत्यांत स्पर्धा लागली होती. पण निवडणुका संपताच समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या आंदोलनात ते गायबच ! अशा दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला आहे,

‘केवळ मतपेटीसाठी मराठा, अन्यथा ओझं’ अशी नेत्यांची वागणूक उघडी पडल्याने मंगळवेढ्यातील मराठा बांधवांमध्ये तीव्र असंतोष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी क्षेत्रातील निवडणुका तोंडावर आहेत. समाजाच्या मनातील ही खदखद जर मतपेटीत उफाळून आली, तर प्रस्थापित नेत्यांचे गणित पूर्णपणे बदलू शकते. फक्त भाषणांतून मोठे बोलणारे, पण अस्मितेच्या लढ्यात एक पाऊलही न टाकणारे नेते पुढेही टिकतील का? की समाजातून नवे नेतृत्व उभे राहील हे आता थेट मतदारांनीच ठरवायचे आहे.

गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील गावांमध्ये चावडी बैठका घेऊन मराठा समाजाला मोठ्या संख्येने मुंबईकडे जाण्यासंबंधीचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. त्यामुळे हजारो गाड्या तालुक्यातून आज निघतील असे चित्र निर्माण झाले आहे. जेव्हा जेव्हा जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण केले तेव्हा तेव्हा मंगळवेढ्यात देखील आमरण उपोषण उभे राहिले. त्यामुळे तालुक्याचे आरक्षण लढ्यात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. तेही सर्वसामान्य मराठा बांधवांचे… त्यामुळे या पुढचा लढा देखील सर्वसामान्य मराठाच लढणार आहेत आणि जशी वेळ येईल तसा हिशोबही चुकता करतील, यात शंका नाही.

जातीच्या जीवावर यश मिळवले

मराठा समाजाच्या अनेक पुढाऱ्यांनी आजपर्यंत आपल्या जातीच्या जीवावर राजकारणात मोठे यश मिळवले, सर्वच राजकीय पक्षात मराठा समाजाच्या नेत्यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे या आंदोलनाला पुढाऱ्यांनी काही ठिकाणी हात झटकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आशा नेत्यांना समाज जागा दाखवतीलच यात शंका नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

11 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago