मुंबई: काँग्रेस पक्ष लोकांमध्ये एक बोलतो आणि प्रत्यक्षात त्याविरुद्ध वागतो. त्यांनी आपला जुना खेळ पुन्हा सुरू केला आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आम्ही कोणाकडेही गेलो नाही. उलट स्थानिक पातळीवर मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना हे पक्ष आमच्याकडे युतीसाठी आले. स्थानिक युतीबाबतचे सर्व अधिकार आम्ही आमच्या जिल्हा कमिटीला दिले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “राज्यात महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भाजप हे दोनच पक्ष ५०-५० टक्के उमेदवार उभे करू शकतात. त्यामुळे आमची ताकद स्पष्ट आहे.”काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना त्यांनी ठामपणे सांगितले की, “ज्या ठिकाणी युतीत काँग्रेसने नीट वागणूक दिली नाही, तिथे आम्ही ती युती उडवून लावली आहे. तडजोडीच्या राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही.”या वक्तव्यामुळे राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…