औरंगाबाद: आपण नारळाला श्रीफळ म्हणतो, त्याला देवाचा दर्जा देतो, एवढंच काय तर पुजेसाठी देखील आपण त्याला महत्वाचं मानतो, देवाजवळचा नारळ आपण प्रसाद म्हणून खातो मग अशा परिस्थीतीत महिलांना ते फोडण्याची परवानगी हिंदू धर्मात का नाही? चला यामाचं कारण समजून घेऊ.
याचा संबंध प्रजनन क्षमतेशी
महिला नारळ फोडत नाही, त्यामागील एक प्रमख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी आहे, त्यामुळे तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जुळलेला आहे अशी मान्यता आहे. महिला बीजरूपातच बाळाला जन्म घालतात. अगदी त्याचाच संबंध नारळाशी लावला गेला. म्हणूनच हिंदू धर्म शास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही.
असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात. एकेकाळी विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही, तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला. या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते. नारळात तीन डोळे बनतात, या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते असे शास्त्रात मानले जाते. म्हणून त्याला स्त्रीया हात लावत नाहीत.
यामागे आहेत आणखी काही कारणं…
यामागे अशी एक कहाणी अशी देखील सांगितली जाते की, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.
नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते. तीन देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो. नारळ हे भगवान विष्णूने पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते. जो देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच देवी लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही. एवढंच काय तर स्त्रियांनी नारळ फोडणे हे हिंदू शास्त्रांमध्ये अशुभ मानले जाते.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…