महाराष्ट्र

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणे आजही प्रेरणादायी

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अधिकृत सुरुवात झाली असून, या निमित्ताने त्यांच्या प्रभावी आणि परखड भाषणांची पुन्हा एकदा आठवण करून दिली जात आहे. बाळासाहेबांची भाषणे आजही लाखो शिवसैनिक आणि मराठी माणसासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना, “बाळासाहेब म्हणजे तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणी” अशा शब्दांत गौरव केला. मोदींवरही बाळासाहेबांच्या भाषणांचा खोल प्रभाव असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच आपल्या वडिलांकडून मिळालेल्या आत्मबळ आणि आत्मविश्वासाच्या मंत्राचा उल्लेख केला. “शिवसैनिक हीच माझी खरी ताकद आहे. शिवसैनिकांशिवाय मी स्वतःला शिवसेनाप्रमुख मानू शकत नाही,” असे ते अनेक भाषणांत ठामपणे सांगत असत.

मुंबईत मराठी माणसाचा कणा ताठ करण्याचे काम शिवसेनेने केल्याचा अभिमान बाळासाहेबांनी व्यक्त केला होता. “शिवसेना नसती, तर मराठी माणूस मुंबईतून फेकला गेला असता,” असे परखड विधान त्यांनी केले होते. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदार-खासदारांनाही त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला होता.

मराठी तरुणांनी केवळ नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे उद्योजक बनावे, अशी त्यांची अपेक्षा होती. मुंबईला सिंगापूर, हाँगकाँग किंवा मलेशियासारखे सुंदर शहर बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीही असल्याचे ते स्पष्टपणे सांगत.

हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्रच आहे आणि त्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असे मत बाळासाहेबांनी वारंवार मांडले. तसेच गांधी घराण्याच्या राजकारणावर टीका करत, नेहरूंच्या धोरणांमुळेच काश्मीर प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याचा आरोपही त्यांनी केला होता. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, भाषणे आणि त्यांचा वारसा पुन्हा एकदा जनतेसमोर येत असून, ते आजच्या पिढीसाठीही दिशादर्शक ठरत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

3 तास ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

3 तास ago