सोलापूर: शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट झाले. शेतकरी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला संसार उद्ध्वस्त होताना बघत आहे. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकवून अधिक मानसिक छळ देण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई देणे हाच योग्य मार्ग आहे. त्यामुळे एकरी किमान ₹५०,००० इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केली.
जयंतराव पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.
जयंतराव पाटील पुढे म्हणाले की, माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे. काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता, त्यातच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आज शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडून व्यक्त केली.यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आ. अभिजीत पाटील, आ. नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…