महाराष्ट्र

शेतमजूर कुटुंबातील मुलीची संघर्षमय प्रेरणादायी कहाणी! ११ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत ग्रामीण बदलासाठी सज्ज

गडचिरोली: “आजही आमच्या गावात अनेक मुलींची लग्नं १८व्या वर्षीच लावली जातात. इच्छा नसतानाही दबावाखाली लग्न करावं लागतं. हे थांबवायचं आहे,” असे ठाम शब्द गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी गावातील २१ वर्षांची शारदा रवींद्र दुगुनलावार उच्चारते. समाजात बदल घडवण्याच्या याच जिद्दीच्या जोरावर तिने देशातील नामांकित शिव नाडर युनिव्हर्सिटी, दिल्ली (एनसीआर) येथे एम.ए. इन रुरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. या उच्च शिक्षणासाठी तिला तब्बल ११ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली असून सध्या ती दिल्लीत शिक्षण घेत आहे.

दुर्गम व आदिवासी भागातील वास्तवाशी झुंज देत शारदाने शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. प्राथमिक शिक्षण गावात झाले, मात्र उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तिला गावापासून १२ किलोमीटर दूर चार्मोशी येथे दररोज सायकलने प्रवास करावा लागत असे. “अभ्यासापेक्षा कॉलेजला जाऊन परत कसं यायचं, हीच जास्त चिंता असायची. बसची सोय नव्हती,” असे शारदा सांगते.

प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी आई-वडिलांचा सुरुवातीला नकार होता. मात्र वर्गशिक्षक डॉ. पंकज नरुले यांच्या समुपदेशनानंतर अखेर शारदाला परवानगी मिळाली. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून समाजकार्याची पदवी तिने घेतली. शिक्षण व हॉस्टेलचा खर्च विद्यादान सहाय्यक मंडळ या ठाणेस्थित स्वयंसेवी संस्थेच्या मदतीमुळे शक्य झाला.

समाजकार्य शिकताना गावातील प्रश्न सतत डोळ्यांसमोर असल्याने ग्रामीण भागात बदल घडवण्याची तिची इच्छा अधिक तीव्र झाली. कॉलेजमधील एका सीनियरकडून शिव नाडर युनिव्हर्सिटीबाबत माहिती मिळाल्यानंतर तिने प्रवेश परीक्षा, मुलाखत व गटचर्चेसाठी तयारी केली आणि यश मिळवले.

युनिव्हर्सिटीच्या सहायक प्राध्यापक डॉ. गुरकिरत कौर सांगतात, “रुरल मॅनेजमेंट कोर्समध्ये केवळ गुणांपेक्षा ग्रामीण भागात बदल घडवण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची असते. शारदाची स्पष्ट दृष्टी आणि मेहनत यामुळे तिची निवड झाली.” हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुमारे १२ लाख रुपये खर्चाचा असून शिष्यवृत्तीतून राहणे, जेवण व शैक्षणिक खर्च पूर्ण केला जातो. अभ्यासक्रमानंतर समाजसेवी संस्थांमध्ये प्लेसमेंटही दिली जाते.

शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर अनेक मुलींनी “आम्हालाही शिकायचं आहे” असे सांगत शारदाशी संपर्क साधल्याचे ती आनंदाने सांगते. “माझ्यासारखी संधी इतर मुलींनाही मिळावी,” हीच तिची इच्छा आहे.

शारदाचे आई-वडील शेतमजूर आहेत. वडील शेतीची अवजारे व फर्निचर बनवतात. “गावातल्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून पोरीनं आमचं नाव मोठं केलं. पोरीला शिकवलं, हेच आमचं भाग्य,” असे वडील रवींद्र दुगुनलावार अभिमानाने सांगतात.

भविष्यात आदर्श गावाची संकल्पना आपल्या गावात प्रत्यक्षात उतरवण्याचं स्वप्न शारदा पाहते. मेधा पाटकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेत पर्यावरण व समाजासाठी काम करण्याचा तिचा निर्धार आहे. शारदाचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यश नाही, तर दुर्गम भागातील मुलींसाठी आशेचा किरण ठरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

22 तास ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

2 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

2 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

3 दिवस ago