क्राईम

आईच्या उपचारासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच केली आयकर अधिकारी वडिलांची निर्घृण हत्या

लातूर: “आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे का देत नाहीत? आमचा सांभाळ का करत नाहीत?” असा जाब विचारत पोटच्याच २९ वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी खोपेगाव (ता. लातूर) येथे घडली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

खोपेगाव पाटी परिसरात राहणारे कृष्णकुमार संभाजी सन्मुखराव (वय ५४) हे लातूर येथील आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास कृष्णकुमार आणि त्यांचा मोठा मुलगा शंतनू (वय २९) यांच्यात वाद झाला. शंतनूची आई आजारी असून औषधोपचारासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली जात होती. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात शंतनूने घरातील भाजी कापण्याचा चाकू उचलून वडिलांच्या मानेखाली जोरदार वार केला. हा वार इतका भीषण होता की, कृष्णकुमार सन्मुखराव यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या नात्यालाच काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून संपूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मयताचा धाकटा मुलगा समीर कृष्णकुमार सन्मुखराव (वय २३) याने दिलेल्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी शंतनूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, आरोपी शंतनू हा पदवीधर असून बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णकुमार सन्मुखराव यांनी खोपेगाव पाटी येथे जागा खरेदी करून नवीन घर बांधले होते. मंगळवारी सकाळी कार्यालयात जाण्याच्या तयारीत असताना पत्नी व मुलामधील औषधोपचाराच्या पैशांवरून झालेल्या वादातून ही दुर्दैवी घटना घडली.

“औषध-गोळ्यांच्या खर्चावरून आई-वडील आणि मुलामध्ये वाद झाला. त्यानंतर मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला केला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला,” अशी माहितीअरविंद पवार, पोलिस निरीक्षक, लातूर ग्रामीण यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

2 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

3 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

3 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

4 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

21 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago