महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडला; फेब्रुवारीत ₹१५०० जमा होण्याची शक्यता

मुंबई: जानेवारी महिना संपत आला असतानाही राज्यातील लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असतानाही महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा ₹१५०० महिलांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, यंदा डिसेंबरचा हप्ता उशिरा मिळाल्यानंतर आता जानेवारीचाही हप्ता रखडल्याचे चित्र आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात हा हप्ता मिळण्याची शक्यता कमी असून फेब्रुवारी महिन्यातच रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी हप्ता मिळण्याची शक्यता

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकांच्या आधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही मतदानापूर्वीच ₹१५०० जमा होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

केवायसी अडचणींमुळे हप्ता रखडल्याचा अंदाज

लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांच्या केवायसी प्रक्रियेत अडचणी आल्यामुळे पैसे जमा झाले नसल्याचे समोर आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता महिलांची प्रत्यक्ष केवायसी केली जाणार असून अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत. केवायसी पूर्ण झाल्यानंतरच थकीत हप्ते जमा केले जाणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून महिलांचे लक्ष आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याकडे लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago