महाराष्ट्र

मुलाच्या आत्महत्येच सहन न झाल्याने आईने उचलल भयानक पाऊल!

पालघर: राज्यात गुन्हेगारी तसेच आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील विविध भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहेत. आता पालघर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलाने केलेल्या आत्महत्येचं दुःख सहन न झाल्याने एका महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – मुलाने केलेल्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने आईनेही विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये घडला आहे.

पालघरमधील सफाळे येथील कांद्रेभुरे येथे ही घटना घडली असून शैलेश पाटील या 26 वर्षीय तरुणाने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी कळताच शैलेशची आई कल्पना पाटील हिने देखील गावातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. मृत शैलेश याची व्हॉट्सअॅपला एका मुलीसोबत मैत्री झाली होती. तसेच तो सेक्सटोर्शनचा बळी ठरल्याचा अंदाज शैलेशच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आता मुलाच्या आत्महत्येचं दु:ख सहन न झाल्याने या महिलेनेही आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आत्महत्या केलेला मुलगा शैलेश याच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे

दरम्यान, कल्पना यांच्या पतीने आणि त्यांच्या मुलीने पोलिस किंवा हॉस्पिटलला न कळवता दोघांचेही अंत्यसंस्कार केले. त्यामुळे कुटुंबातील या दोन्ही सदस्यांनी आत्महत्या का केली आणि अंतिम संस्कारापूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती का दिली नाही, याचा तपास सुरु केला आहे, अशी माहितीही केळवा पोलिसांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

24 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

24 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

24 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago