महाराष्ट्र

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशीच नव्हे, तर महाविकास आघाडीशी आणि जनतेशीही केलेली गद्दारी असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. महायुतीच्या विरोधात जनतेने मतदान करून या खासदारांना विजयी केले होते. त्यामुळे त्यांच्या या कृतीला जनतेचा विश्वासघात मानत अशा गद्दारांना भविष्यात जनता धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, बंडखोरी करणारे हे सहा खासदार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे प्रचार केला, कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. मात्र आता त्यांनी केलेली बंडखोरी हा त्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अपमान आहे.

“पैशासाठी लाचार झालेले लोक जनतेची सेवा करू शकत नाहीत. ज्यांना फक्त पैशाचे आकर्षण असते, ते कोणाचेही नसतात,” अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. लोकशाही आणि संविधानिक मूल्ये पायदळी तुडवत भाजप ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकांमध्ये पैसा आणि सत्तेचा गैरवापर होत असून, विजय मिळवता आला नाही तर विजयी उमेदवारांना विकत घेण्याचा किंवा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले.

देशातील लोकशाही संस्थांवर दबाव निर्माण झाला असून विधिमंडळ, संसद आणि न्यायव्यवस्थेतही न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, सर्व संस्थांवर भाजपने कब्जा केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. दहशतीच्या जोरावर राज्यकारभार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

16 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

16 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

16 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

16 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

16 तास ago