महाराष्ट्र

१२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार

राज्यात ६६.२८ टक्के मतदान

मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.

या निवडणुकीसाठी एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. राज्यभरातील २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीकडे विशेष लक्ष दिले जात होते.

अखेर राज्य निवडणूक आयोगाने रविवारी अंतिम मतदान आकडेवारी जाहीर केली असून, राज्यात सरासरी ६६.२८ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. एकूण १ कोटी ४१ लाख ९० हजार २११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

परभणीमध्ये सर्वाधिक मतदान

राज्यातील सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात झाले असून, येथील ९ पंचायत समित्यांसाठी ७४.८९ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल कोल्हापूर (७४.४५ टक्के) आणि छत्रपती संभाजीनगर (७२.६९ टक्के) जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

जिल्हानिहाय मतदान टक्केवारी

रायगड – ६९.९१%

रत्नागिरी – ५५.७९%

सिंधुदुर्ग – ६१.९८%

पुणे – ६८.३५%

सातारा – ६७.८०%

सांगली – ६९.७६%

सोलापूर – ६५.९०%

कोल्हापूर – ७४.४५%

छत्रपती संभाजीनगर – ७२.६९%

परभणी – ७४.८९%

धाराशिव – ६५.२२%

लातूर – ६३.७९%

तीन जिल्ह्यांत ७० टक्क्यांहून अधिक मतदान

जिल्हा परिषद निवडणुकीत कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. तर, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ५५.७९ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

आज जाहीर होणारे निकाल स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार असून, प्रमुख पक्षांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

5 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago