महाराष्ट्र

त्या रस्ताची चाळण; १७ शाळांतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, ग्रामस्थांचा महामार्ग रोखण्याचा इशारा

पुणे: शहापूर तालुक्यातील वाशाळा ते कसारा हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता अधिकारी–ठेकेदारांच्या मिलीभगतीमुळे अक्षरशः चाळण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. माळशेज घाटमार्गे पुणे शहराला जोडणारा हा रस्ता तब्बल १७ शाळांना जोडतो. मात्र नागमोडी वळणे, तीव्र चढ-उतार आणि खोल खड्ड्यांमुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून कालावधी संपत आला असतानाही एप्रिल २०२५ पासून ठेकेदाराने काम बंद ठेवल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. वाशाळा, वेळूक, ढाकणे, कोथळे, फुगाळे, कलभोंडा, कोठारे, तलवाडा आणि डोळखांब ग्रामपंचायतींसह अनेक गाव-पाड्यांसाठी हा एकमेव मार्ग असल्याने संताप तीव्र झाला आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-नाशिक महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

रखडलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे

तीव्र वळणे व चढ-उतार कमी करून सुरक्षितता वाढवावी

धोकादायक झाडेझुडपे हटवून रस्ता मोकळा करावा

पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे व मोऱ्यांची व्यवस्था करावी

नवीन पुलाचे अंतर व उंची वाढवावी

भावली धरण योजनेचे काम रस्त्याला अडथळा ठरणार नाही याची दक्षता घ्यावी

मंजूर रुंदी कायम ठेवून संरक्षण भिंतीची मजबुती सुनिश्चित करावी

ही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी प्रशासनाकडे केली आहे.

अपघातांची मालिका; ग्रामस्थ संतप्त

नादुरुस्त रस्त्यामुळे गेल्या महिन्यात जांभूळवाड येथील एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला. टोकरखांड येथील एका शिक्षकाला अपघातात कायमचे अपंगत्व आले असून सोबतची शिक्षिका गंभीर जखमी झाली. चिंध्याची वाडी येथील युवकही अपघातामुळे कायमचा अपंग झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या पाच वर्षांत झालेल्या अपघातांची संख्या मोजणेही कठीण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 मिनिटे ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

17 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

21 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

21 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

21 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

21 तास ago