महाराष्ट्र

महाराष्ट्र देशाचे ‘लीडिंग लॉजिस्टिक्स गेटवे’ बनवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स केंद्र बनवण्यासाठी परिवहन विभाग पथदर्शक भूमिका बजावेल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ऑल इंडिया लॉजिस्टिक वेलफेरे अससोसिएशन आयोजित लॉजिस्टिक्स समीटला भेट दिल्याप्रसंगी बोलत होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणूनही वेगाने विकसित होत आहे. मुंबईतून औषधे, ताजी कृषी उत्पादने, अभियांत्रिकी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची मजबूत उपस्थिती निर्माण झाली आहे.

मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियातील बाजारपेठांशी महाराष्ट्राला अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग यांसारख्या द्रुतगती मार्गांमुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला असून राज्यातील मालवाहतुकीला मोठा वेग मिळाला आहे.

PM गतिशक्ती मास्टर प्लॅन अंतर्गत केंद्र सरकारसोबत समन्वय साधत बंदरे, विमानतळ, रेल्वे आणि रस्ते यांच्यात सुसूत्रता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स अधिक सुलभ, जलद आणि परिणामकारक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रस्ता वाहतूक ही अर्थव्यवस्थेचा कणा असून ६५ टक्क्यांहून अधिक मालवाहतूक रस्त्यांमार्फत होत असल्याचे सांगत त्यांनी ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेरे अससोसिएशन आणि बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट अससोसिएशन यांसारख्या संघटनांसोबत समन्वयाने काम सुरू असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील अनेक आरटीओ सेवा ऑनलाइन व फेसलेस करण्यात आल्याने पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय Messe Muenchen India आयोजित ‘एअर कार्गो इंडिया ’ आणि ‘ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्स इंडिया’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमुळे उद्योग नेते, धोरणकर्ते, जागतिक भागीदार आणि तंत्रज्ञान पुरवठादार एकाच व्यासपीठावर येत असून सहकार्य व गुंतवणुकीला चालना मिळत आहे.

“महाराष्ट्र जलद, स्मार्ट आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे ठामपणे सांगत मंत्री सरनाईक यांनी राज्याला देशाचे ‘लीडिंग लॉजिस्टिक्स गेटवे’ बनवण्याचा विश्वास व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

10 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago