महाराष्ट्र

जनतेच्या पैशावर सत्ताधाऱ्यांची विलासशाही; विशेष सुविधांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ची मागणी

मुंबई: वाढती महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार-खासदारांना मिळणाऱ्या विशेष सुविधा आणि शासकीय खर्चावर तीव्र टीका करणारा लेख सध्या चर्चेत आला आहे. “जनतेचा पैसा जनतेसाठी की सत्ताधाऱ्यांच्या सुखसोयींसाठी?” असा थेट सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या विशेषाधिकारांवर मर्यादा आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

लेखात पेट्रोल, गॅस, वीज, शिक्षण आणि औषधांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. एका बाजूला शेतकरी कर्जबाजारी होत असून बेरोजगार तरुण नोकरीसाठी भटकत आहेत, तर दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींना मोफत बंगले, वीज, पाणी, प्रवास, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि आजीवन पेन्शन दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“जनतेने टोल भरायचा आणि जनप्रतिनिधींना टोलमाफी का?” असा प्रश्न उपस्थित करत संसद कॅन्टीनमधील स्वस्त दर, परदेश दौऱ्यांवरील खर्च, सरकारी वाहनांचा वापर आणि अवाजवी सुरक्षा ताफ्यांवरही निशाणा साधण्यात आला आहे.

लेखात आमदार-खासदारांचे विशेष भत्ते, मोफत निवास व्यवस्था, अमर्याद प्रवास सुविधा, आजीवन पेन्शन आणि इतर शासकीय सवलती तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. “देशभक्ती म्हणजे घोषणाबाजी नव्हे, तर स्वतःच्या सुविधांवर मर्यादा आणून जनतेसाठी त्याग करणे,” असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, या भूमिकेमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, जनतेच्या पैशाच्या वापराबाबत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी जोर धरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

18 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago