CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
सोलापूर: काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे सातत्याने चारित्र्यहनन, अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्ये करून स्त्रीत्वाचा अपमान केल्याचा आरोप करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. ही नोटीस ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले आणि ॲड. आर्या राजेभोसले यांनी प्रणिती शिंदे यांच्या वतीने बजावली आहे.
८ मे २०२६ रोजी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून हा वाद निर्माण झाला. “सोलापूरच्या विकासापेक्षा त्यांना दिल्लीचा रस्ता आणि राहुल गांधी यांच्या घराकडेच लक्ष आहे,” असे सूचक आणि द्वयर्थी विधान करून गोरे यांनी प्रणिती शिंदे यांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नोटिशीत करण्यात आला आहे. हे वक्तव्य मोहोळ-वळसंग रस्त्याच्या श्रेयवादाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते.
नोटिशीनुसार, गोरे यांनी पत्रकाराच्या प्रश्नाशी संबंध नसताना केलेले विधान हे जाणूनबुजून एका महिला लोकप्रतिनिधीच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करणारे आणि लैंगिक सूचकतेचा वापर करणारे होते. त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला गंभीर धक्का बसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नोटिशीत जयकुमार गोरे यांनी यापूर्वीही केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
२० जानेवारी २०२६ रोजी त्यांनी “त्या ५० फूट खाली पडल्या आहेत आणि तरीही त्यांचे पाय वरच आहेत,” अशी टिप्पणी केल्याचा उल्लेख आहे. तसेच २० एप्रिल रोजी प्रणिती शिंदे यांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आणि १४ एप्रिल रोजी जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत बोलताना “हा निधी पाकिस्तानसाठी नाही” असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांच्या देशप्रेमावर शंका घेतल्याचा आरोपही नोटिशीत करण्यात आला आहे.
जयकुमार गोरे यांची बोलण्याची पद्धत, देहबोली आणि महिलांबद्दलचा दृष्टिकोन हा असंस्कृत, अनादरयुक्त आणि महिलांचा अपमान करणारा असल्याचा आरोपही नोटिशीत करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील विविध व्हिडिओंचा उल्लेख करत त्यांच्या वक्तव्यांतून द्वेषपूर्ण आणि उपहासात्मक भूमिका दिसून येत असल्याचे वकिलांनी म्हटले आहे.
भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराला सभ्यता, नैतिकता आणि बदनामीसंदर्भातील मर्यादा आहेत. जयकुमार गोरे यांनी त्या मर्यादा ओलांडत स्त्रीत्वाचा अपमान, विनयभंगासदृश वर्तन आणि फौजदारी मानहानी केली असल्याचा आरोप नोटिशीत करण्यात आला आहे. तसेच मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचे उल्लंघन केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांची बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी, ती मुद्रित व सामाजिक माध्यमांत प्रसिद्ध करावी आणि भविष्यात महिलांविरोधात अपमानास्पद वक्तव्ये करणे थांबवावे, अन्यथा न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला असल्याची माहिती ॲड. श्रीया आवले यांनी दिली.
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…