कणेगाव: वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे एका पाठोपाठ घडलेल्या दोन मृत्यूंनी संपूर्ण गाव हादरून गेले आहे. सत्तर वर्षांचे राजेंद्र गोविंद पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या बहिणीचाही दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे कणेगावसह बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
कणेगावचे रहिवासी राजेंद्र गोविंद पाटील (वय 70) यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी नातेवाईक, भावकी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी त्यांची बहिण उर्मिला (वय 72) या पती उध्दव शिंदे यांच्यासह बोरगाव येथून कणेगावला आल्या होत्या. भावाचे शेवटचे दर्शन घेताना त्या भावनिक झाल्या होत्या. कितीही वय झाले तरी माहेरचा आधार गमावल्याची जाणीव त्यांच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत होती.
अंत्यसंस्कारानंतर रात्री सुमारे अकरा वाजता उर्मिला शिंदे या पती व इतरांसह कारमधून बोरगावकडे निघाल्या. गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीजवळ येताच अचानक रस्त्यालगत उभे असलेले भलेमोठे झाड कोसळले. ते झाड थेट त्यांच्या कारवर पडले.
या भीषण अपघातात उर्मिला शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. पती उध्दव शिंदे, वाहनचालक आणि सोबत असलेली एक महिला गंभीर जखमी झाले. झाड कोसळल्याचा मोठा आवाज ऐकताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उर्मिला शिंदे यांना वाचवता आले नाही.
भावाच्या अंत्यसंस्काराला आलेली बहीण अशा दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडल्याने संपूर्ण कणेगाव सुन्न झाले आहे. उर्मिला शिंदे यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. या दुहेरी शोकांतिकेने कणेगाव आणि बोरगाव परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…