महाराष्ट्र

राज्यातील भगिनींनी दुर्गा अवतार घेऊन भाजपाच्या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचावे

महागाईत होरपळणाऱ्या लाडकी बहिणीच्या हातात फक्त १५०० रुपये टेकवण्याचे युती सरकारचे सोपस्कार

मुंबई: महागाईने गृहिणींचे प्रचंड हाल होत असताना केवळ १५०० रुपये देऊन भाजपा सरकार मदत केल्याचे सोपस्कार पार पाडत आहे. केवळ पैसे देऊन महिलांचा सन्मान होत नाही. काँग्रेस सरकारने वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हिस्सा देण्याचा कायदा करुन महिलांचा सन्मान केला. राज्यातील ६७ हजार महिला बेपत्ता आहेत, त्यावर सरकारला प्रश्न विचारला तर सरकार उत्तर देऊ शकले नाही, महिलांवर अन्याय, अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. आता राज्यातील भगिनींनीच दुर्गा अवतार घेऊन भाजपाच्या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

भंडारा विधानसभेच्या काँग्रेस मविआच्या उमेदवार पुजा गणेश ठवकर तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातून काँग्रेस मविआचे उमेदवार दिलीप वामन बनसोड यांचा उमेदवारी अर्ज नाना पटोले यांच्या उपस्थितीत दाखल करण्यासाठी सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोले, माजी पालकमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, आमदार अभिजित वंजारी, मा. आ. वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हा काँग्रेस कमितीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बदलापुरात भाजपाच्या शाळेत ३-४ वर्षांच्या लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले, लोकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला तरिही शाळेच्या संचालकांवर कारवाई केली नाही, कोर्टाने झापल्यानंतर शाळेच्या संचालकांना अटक केली. भाजपा युतीचे सरकार महिलांना न्याय देऊ शकले नाही. मविआचे सरकार आल्यावर महिला सक्षमिकरणावरही भर देऊ, असे नाना पटोले म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

13 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

13 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

13 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago