राजकीय

भाजपा सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय

मविआचे सरकार आल्यावर मोदी-शाहांची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही

मुंबई: भाजपा सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प व नोकऱ्या हिरावणाऱ्या महाराष्ट्रद्रोही भारतीय जनता पक्ष युतीला विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

टाटा एअरबस प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये उद्घाटन केले, त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते, ते पुढे म्हणाले की, टाटा एअरबस या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती तसेच या प्रकल्पामुळे १० हजार रोजगार उपलब्ध होणार होते पण हा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ दिला नाही. भाजपाचे केंद्रातील सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेमुळे हा मोठा प्रकल्प गुजरातला पळवला. वेदांता फॉक्सकॉन हा १.५० लाख कोटी रुपयांचा प्रकल्पही याच महाराष्ट्रद्रोही लोकांनी महाराष्ट्रात होऊ दिला नाही. भाजपा युती सरकार नोकर भरती करत नाही आणि ज्या प्रकल्पामुळे राज्यातील तरुण मुलामुलींना रोजगार मिळणार होते तो प्रकल्पही गुजरातला पळवला आहे.

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले नाहीत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असतात, त्या फडणवसांनी टाटा एअरबस प्रकल्पाचे गुजरातमध्ये उद्घाटन झाले आहे हे डोळे उघडे करुन पहावे व महाराष्ट्राला चुकीची माहिती देऊ नये. राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारमुळेच महाराष्ट्राची प्रगती खुंटली असून राज्य पिछाडीवर गेले आहे. ‘मोदीजी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार’ अशा थापा मात्र आता शिंदे फडणवीसांनी मारू नयेत, असेही नाना पटोले म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

10 मिनिटे ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

17 मिनिटे ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

19 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

23 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

23 तास ago