महाराष्ट्र

संघटन चळवळीतील वटवृक्ष ग.दि.कुलथे अनंतात विलीन

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी साश्रू नयनांनी भावना केल्या व्यक्त

ठाणे: राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक, सल्लागार गणपत दिनकर कुलथे, यांचे वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या नेरुळ येथील राहत्या घरी काल (दि.14) एप्रिल रोजी रात्री 9.00 वाजता निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नेरूळ येथील शांतीधाम येथे कुलथे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुलथे कुटुंबियांसमवेत विविध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, विविध संलग्न संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, राजपत्रित अधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष रवींद्र धोंगडे, विद्यमान अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, दुर्गा मंचच्या अध्यक्षा डॉ.सोनाली कदम, माजी माहिती संचालक देवेंद्र भुजबळ आदींनी यावेळी स्वर्गीय श्री.कुलथे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित सर्वांनी स्वर्गीय ग.दि.कुलथे यांचे संघटना चळवळीतील राहिलेले अपूर्ण कार्य त्याच तडफेने, प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा संकल्प करून स्व. श्री.कुलथे यांना श्रद्धांजली वाहिली.

स्व.श्री.ग.दि.कुलथे यांचा अल्प परिचय 

गणपत दिनकर कुलथे, जन्म -१.३.१९३९ रोजी, पारनेर (अहमदनगर) येथील शिक्षण कमवा व शिका योजनेतून रयत शिक्षण संस्थेत सातारा येथे. लिपिक म्हणून विक्रीकर विभागात सेवा सुरुवात केली आणि कर्मचारी संघटनेत ते स्थिरावले. कर्मचारी संघटनेत विविध पदावर काम करीत बृहन्मुंबई कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस पदी प्रभावीपणे कार्य केले.

अधिकारी पदावर पदोन्नत झाल्यानंतर विक्रीकर अधिकारी संघटनेत देखील महत्वाची पदे भूषविली. विक्रीकर विभागात कार्यरत असतानाच ७ फेब्रुवारी १९८६ रोजी महासंघाची स्थापना केली. सदर महासंघात प्रथम ७ विभागीय संघटना होत्या त्याच विस्तार होऊन ७२ विभागीय संघटनांना सामावणारा अधिकारी महासंघ आज ३९ वर्षाच्या वटवृक्षासारखा विस्तारला आहे. अशा प्रकारे तब्बल ५० वर्षाहून अधिक काळ संघटन चळवळीत सहभागी राहिले आहेत. त्यातच १९९६ साली सेवानिवृत्तीनंतर देखील तब्बल २९ वर्षे राजपत्रित अधिकारी महासंघाचे कार्य अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करीत होते.

साहेबांच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक झाली असून त्यात सर्व वेतन आयोगांची केंद्राप्रमाणे राज्यात अंमलबजावणी झाली. महागाई भत्ता आणि इतर लाभ मिळत राहिले, अधिकाऱ्यांच्या पाल्यांना देखील अनुकंपा तत्वावर भरतीचा लाभ आदी बरेच प्रश्न सुटले आहेत. त्यातच अधिकाऱ्यांच्या कल्याणार्थ उभारत असलेले बांद्रा पूर्व येथील कल्याणकेंद्र हा त्यांचा महत्वकांशी प्रकल्प आहे. आता त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी अधिकारी परिवारास एकत्र येऊन प्रयत्न करावयाचे आहे. कल्याणकेंद्र इमारत उभारल्यास तीच खरी कै.ग.दि.कुलथे साहेबांना श्रद्धांजली ठरेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

6 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

6 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

11 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

11 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

11 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

11 तास ago