शिरूर तालुका

अन्नापुरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा थरार, मेंढपाळाची मेंढी फस्त

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांची शासनाला घणाघाती मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे अन्नापुर येथे पुन्हा एकदा बिबट्याने थैमान घातले. १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सुमारास मेंढपाळ मोहन दामू चोरमले (वय ५०) आणि त्यांचा मुलगा सोनबा मेंढरे चारत असताना, ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एक मेंढी फस्त केली. धाडसी प्रतिकार करून सोनबा यांनी आरडाओरड, दगडफेक करत बिबट्याला हुसकावून लावले, मात्र तोपर्यंत त्या मेंढीला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे सुमारे १३-१४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, दूध पिणाऱ्या पिल्लाचे करुण विलाप हृदयद्रावक होता.

घाबरलेल्या अवस्थेत मेंढपाळाने शिरूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांना संपर्क केला. तत्काळ प्रतिसाद देत वाळुंज यांनी शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी कर्मचारी पाठवले गेले.

बिबट्यांचे वाढते हल्ले पाहता, अन्नापुरसह शिरूर तालुक्यात तातडीने प्रतिबंधक उपाययोजना करण्यात याव्यात. मनुष्यहानी झाल्यास बाधित कुटुंबातील एकास तत्काळ शासन सेवेत भरती करण्यात यावे.बिबट प्रवण क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच लागू करावे. हल्ल्यांमध्ये अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास वैद्यकीय खर्च व कुटुंबीयांचे पुनर्वसन व्हावे.”घरांभोवती मोफत तारेची कुंपण योजना राबवावी. पकडलेल्या बिबट्यांना इतर राज्यांतील अभयारण्यात हलवावे.” या विषयावर ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर जनआंदोलनाचा इशारा वाळुंज यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

6 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago