मुंबई: मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डे घेतल्यास प्रति खड्डा ₹१५,०००/- दंड आकारण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ अन्यायकारक नव्हे, तर मुंबईतील लाखो गणेशभक्तांच्या श्रद्धेवर आघात करणारा आहे. मागील वर्षी हीच रक्कम ₹२,०००/- इतकी होती, ती सातपट वाढवून अचानक ₹१५,०००/- करणे म्हणजे गणेशोत्सवावर अडथळे निर्माण करणे होय.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. अभिजीत बांगर यांची भेट घेतली. मंडळांसमोरील अडचणी, वाढते खर्च, कमी होणारी वर्गणी, व पालिकेच्या अन्यायकारक धोरणांविरोधात ठाम भूमिका मांडण्यात आली.
खास मुद्दे जे अधोरेखित करण्यात आले.मुंबईतील रस्ते आधीच पालिकेच्या निष्काळजीपणामुळे खड्ड्यांनी पोखरले आहेत, त्यावर कोणताही दंड नाही. सार्वजनिक गणेशोत्सव ही एक धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ आहे. तिच्यावर ‘दंडात्मक’ धोरण लादणे अशोभनीय आहे.
नुकताच पवईत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एक तरुण बळी गेला याला जबाबदार कोण?
बांगर यांनी सांगितले की, पालिकेचे आयुक्त मा. भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करून सार्वजनिक मंडळांसाठी न्याय्य आणि सहकार्यपूर्ण मार्ग काढण्यात येईल.
यासोबतच, शहरातील उड्डाणपूलांवरील धोकादायक खड्डे, साचलेले सांडपाणी, आणि पावसामुळे निर्माण होणाऱ्या अपघातांची समस्या अधोरेखित करत, शिष्टमंडळाने ठोस उपाययोजनांची मागणी केली.
सर्व उड्डाणपूलांवरील खड्ड्यांची गुणवत्तापूर्ण दुरुस्ती दोषी कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
तुंबलेले नाले व प्रवाह मार्गांची तात्काळ सफाई तृतीय पक्ष परीक्षणासह देखभाल समिती स्थापन करणे
आमचा स्पष्ट इशारा आहे. जर हा दंडाचा निर्णय मागे घेतला नाही, तर सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले व त्यांच्या शिष्ट मंडळ दिला. शिष्टमंडळामध्ये पुढील प्रमाणे पदाधिकारी उपस्थित होते. ओमकार शिर्के, अमोल हिरे, मुंबई उपाध्यक्ष इम्रान तडवी, सत्यनारायण यादव, रोहित सावंत मुंबई सरचिटणीस, हनीफ पटेल, वैभव पांचाळ, मुंबई सचिव कैलास कुशेर, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष सचिन लोंढे, उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष संजय कोळी, चेंबूर तालुका अध्यक्ष, कमलेश दांडगे जोगेश्वरी तालुका अध्यक्ष, स्वप्नील पाटील अंधेरी पश्चिम तालुका अध्यक्ष, सुयोग भुजबळ भायखळा तालुका अध्यक्ष आबीद शेख वॉर्ड अध्यक्ष 209,कुणाल इनकर वॉर्ड अध्यक्ष 122,राजेंद्र ढवळे वॉर्ड अध्यक्ष 157 बेसिक, मुंबईतील जनतेच्या श्रद्धेला दडपणात टाकणाऱ्या कोणत्याही धोरणाचा आम्ही निषेध करतो आणि जनभावना केंद्रस्थानी ठेवणारा निर्णय घ्यावा, अशी आमची प्रशासनाकडे ठाम मागणी आहे.
मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…
न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…