मुख्य बातम्या

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरुच; रांजणगावजवळ लोखंडी रोडने वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका काही केल्या थांबत नसुन असाच एक धक्कादायक प्रकार पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव जवळ घडला. काही अज्ञात व्यक्तींनी थेट लोखंडी रोड घेऊन एसटीच्या वाहकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळेवर हस्तक्षेप करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

या प्रसंगात वाहक सुखरुप बचावला असला तरी या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेकरता झटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होणं अत्यंत चिंताजनक आहे. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन चौकशी सुरू केली असुन हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. यावेळी स्थानिक नागरिक व प्रवाशांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असुन एस टी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

12 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago