महाराष्ट्र

गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा..

मुंबई: राज्य सरकारने 14 मार्च 2024 रोजी अधिसूचना जारी करत गुंठेवारी खरेदी-विक्रीला मंजुरी दिली आहे. यामुळे नागरिकांना आता पूर्वी अडकलेले जमिनीचे व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय करावे लागेल

पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडिरेकनरच्या 5% रक्कम शासनाला शुल्क म्हणून भरावी लागेल.

त्यानंतर त्या जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार अधिकृतरित्या करता येईल.

या तीन कारणांसाठी मिळेल परवानगी:

विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी.

शेती किंवा रस्त्यासाठी जमिनीचा व्यवहार करता येईल.

घर बांधण्यासाठी गुंठेवारी जमिनीचा खरेदी-विक्रीस मार्ग मोकळा

अधिक तपशील

1947 मध्ये लागू झालेल्या तुकडेबंदी कायद्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध होते. 2017 मध्ये बाजारमूल्याच्या 25% शुल्क आकारण्याची अट घालण्यात आली होती, जी सर्वसामान्यांसाठी कठीण होती. परंतु, आता 5% शुल्क भरून जमीन नियमित करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

महत्त्वाचे:

एक, दोन, तीन, चार किंवा पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करता येणार.

नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामीण भागातील प्रांताधिकाऱ्यांकडून गुंठेवारी नियमित केल्याचा दाखला घ्यावा लागेल.

गुंठेवारी जमीन खरेदी-विक्री नियमित करण्यासाठी, संबंधित अर्ज खालीलप्रमाणे सादर करावा

शहरी भागासाठी: नगरपालिका किंवा महानगरपालिकेतील संबंधित विभागाकडे अर्ज सादर करावा.

ग्रामीण भागासाठी: संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या (Sub-Divisional Officer) कार्यालयात अर्ज द्यावा.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:

पूर्वीच्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या 5% रक्कम शासनाला शुल्क म्हणून भरल्याचे प्रमाणपत्र.

विहिरीसाठी अर्ज करताना, भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरणाने दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र.

शेतरस्त्यासाठी अर्ज करताना, रस्त्याचा कच्चा नकाशा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

10 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

15 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago