महाराष्ट्र

विधी मंडळाच्या विविध समितीचे कामकाज पारदर्श पद्धतीने झाले पाहिजे, यात काम करणाऱ्या सगळ्यांचे स्क्रिनिंग करावे

हुंडाबळी प्रकरणातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर कडक कारवाई व्हावी

नागपूर: महाराष्ट्राच्या विधी मंडळ समितीचा अभ्यास दौरा धुळे इथे होत असताना पैसे सापडले ही घटना गंभीर आहे. याने विविध समित्यांच्या कामकाज बाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. या समितीच्या कामकाज शुभारंभाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरी असे प्रकार घडत असतील तर या समिती संदर्भात सगळ्यांचे स्क्रिनिंग झाले पाहिजे असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील विविध प्रश्नावर काम करण्यासाठी समित्यांची नेमणूक होते.पण सध्या सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. या समित्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर याचे कामकाज पारदर्श पद्धतीनं व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी पावले उचलावी. लोकप्रतिनिधी यांच्या दौऱ्यावर असे प्रश्न उपस्थित होत असतील तर अभ्यास दौरे करावे की करू नये याबाबत विधानसभा अध्यक्ष, सभापती यांनी याबाबत लक्ष घालावे अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधी बदनाम होतात त्याचा समितीच्या कामकाजावर परिणाम होत हे दुर्दैवी आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकार हा संतापजनक आहे. या प्रकरणात सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षातील नेते आहेत.यांच्यावर कायद्याने कठोर कारवाई झाली पाहिजे. दोन कोटी रुपयासाठी एका लेकीचा बळी जाणे ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे यात जे कोणी दोषी आहे त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आहे. महाराष्ट्र सारख्या राज्यात राजकीय नेते हुंडाबळीसाठी जबाबदार असतील तर याबाबत सरकारने अजून कडक धोरण बनवावे, अशी मागणी विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत सरकार पावलं उचलत नाही दुसरीकडे बोगस बियाण मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बोगस बियाणे बनवणारे आणि विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. यासाठी जास्त शिक्षेची तरतूद करणारा कायदा ही करावा असे वडेट्टीवार म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

5 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago