उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट
मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य जपणे महत्वाचे आहे. विशेषतः तरुण पिढीना आणि महिलांना या धावपळीच्या ताणतणावाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे,असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान अंतर योग फाउंडेशन उपक्रमांची माहिती घेतली तसेच फाउंडेशनद्वारे योग आणि मानसिक आरोग्यविषयक सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, महिलांना आणि युवापिढीला योग व आध्यात्मिकतेच्या मार्गाकडे प्रवृत्त करून त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्य ही महत्त्वाची बाब असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो असेही यावेळी सांगितले.यावेळी अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी आणि अंतर योग फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…