महाराष्ट्र

छ. संभाजीनगरची ऐतिहासिक प्रगती, कन्नडच्या औट्रम घाटात चार बोगदे आणि रेल्वेमार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर

औरंगाबाद: मराठवाड्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील कन्नड तालुक्यातील औट्रम घाटात चार बोगदे बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकत्याच दिल्लीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या बोगद्यांपैकी एकातून रेल्वे  तर दुसऱ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील वाहतूक सुरू होणार आहे. उर्वरित दोन बोगदे सुरक्षेसाठी राखीव ठेवले जाणार आहेत.

७,००० कोटींचा प्रकल्प

या बोगद्यांच्या बांधकामासाठी एकूण ७,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च दोन्ही मंत्रालयांमध्ये अर्धा-अर्धा वाटून घेण्यात येणार आहे.

३,५०० कोटी रुपये – रेल्वे मंत्रालय

३,५०० कोटी रुपये – NHAI

या प्रकल्पासाठी लवकरच DPR (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात येणार असून, त्यासाठी देखील खर्च वाटून घेण्याचे निश्चित झाले आहे. काही महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

बोगद्यांची रचना आणि कार्यपद्धती

एकूण चार बोगदे – एक रेल्वेसाठी, एक महामार्गासाठी आणि दोन सुरक्षिततेसाठी

१५ किलोमीटर लांबीचे बोगदे

डोंगरात खोदून सुरक्षित व जलद दळणवळण मार्ग उपलब्ध करणार

रेल्वेमार्गामुळे छत्रपती संभाजीनगर – चाळीसगाव – सोलापूर असा नवा कनेक्शन तयार होणार

वाहतुकीत होणारा मोठा बदल

सध्या औट्रम घाटात बोगदा नसल्यामुळे वाहनचालकांना ११० किमीचा वळसा घालावा लागतो. यामुळे इंधनाचा खर्च, वेळेची नासाडी तसेच वाहतूककोंडी सारख्या समस्या सतत उद्भवत होत्या. या बोगद्यांमुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर अपघातदरही लक्षणीय घटेल.

औद्योगिक प्रगतीस चालना

प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.

किर्लोस्कर व इतर नामवंत कंपन्यांचे उद्योग

वाहतूक खर्चात कपात

स्थानिक रोजगाराच्या संधी वाढणार

चाळीसगाव रेल्वेमार्गालाही चालना

या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्गालाही गती मिळणार आहे. बोगद्यांच्या DPR साठी रेल्वे मंत्रालयाने आपले आदेश दिले असून, लवकरच त्याची कार्यवाही सुरू होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

23 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

23 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago