मुंबई: महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. त्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.
वास्तविक राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे, राज्य शासनास वेळोवेळी मार्गदर्शन करणे अशा अनेक गोष्टी भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून अपेक्षित होत्या. परंतु सरकार स्थापनेचे निमंत्रण न देताच एकनाथ संभाजी शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला, याचा खुलासा आरटीआयमधून झालेला आहे असेही महेश तपासे म्हणाले.
अनेक वक्तव्यांवर स्वतःचे मत मांडणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले नसल्याचे आता आरटीआयच्या माहितीतून समोर आले आहे यावरही आपले मत भगतसिंग कोश्यारी यांनी मांडायला हवे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकार पायउतार होताच शिंदे -फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले पत्र अखेर कुठे आहे. याचे उत्तर भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…