महाराष्ट्र

पुण्यात वाहतूक सुधारण्यासाठी पोलिसांचा कठोर कारवाईचा चाबूक; नियम मोडणाऱ्यांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरण

पुणे: पुणे शहरात बेशिस्त वाहनचालकांच्या गैरव्यवहारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे दिसून आले आहे. ट्रिपलशीट, नो एंट्रीतून वाहन चालवणे, राँग साईड ड्रायव्हिंग, धोकादायक वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, फुटपाथवर पार्किंग आणि सिग्नल जंपिंग यासारख्या गंभीर नियमभंगांवर पुणे पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात शहरातील बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई राबवण्यात आली. यामध्ये दंड, वाहन जप्ती आणि परवाना निलंबन यासारख्या उपाययोजना केल्या गेल्या. विशेषतः ट्रिपलशीट व राँग साईडमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेता ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्यात आले आहे.

पोलिसांच्या प्रयत्नांमुळे शहरातील वाहतूक सुधारली असून, एका संस्थेच्या अहवालानुसार पुणे शहराचा वाहतूक कोंडी क्रमांक सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आला आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालय परिसर व रहिवासी भागात विशेष मोहिमा राबवून नियमभंग करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मोहिमेमुळे नागरिकांमध्ये “दंड भरून मोकळे होण्यापेक्षा नियम पाळणेच सुरक्षित” अशी जाणीव हळूहळू निर्माण होत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप नियम मोडणारे चालक आढळत असल्याने पोलिसांनी ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

18 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago