मनोरंजन

‘एवढा विकृत…!’ अखेर अंशुमनचा खरा चेहरा उघड; स्वानंदीमुळे श्वेताला न्याय

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या मोठ्या ट्विस्टमुळे चर्चेत आली आहे. स्वानंदी आणि समर यांच्या नात्यात सतत गैरसमज निर्माण करणाऱ्या अंशुमनचा अखेर खरा चेहरा समोर आला असून, स्वानंदीच्या धाडसामुळे श्वेताला न्याय मिळताना पाहायला मिळणार आहे.

स्वानंदी आणि समर यांच्यातील नातं सुरुवातीपासूनच गैरसमज, भांडणांनी भरलेलं दिसत आहे. समरचा भाऊ अंशुमन आणि काकू मल्लिका यांच्या कारस्थानांमुळे हे गैरसमज अधिकच वाढले. कधी पैशांची लालच दाखवून, तर कधी समस्या निर्माण करून त्यासाठी स्वानंदीला जबाबदार ठरवण्यात आलं.

दरम्यान, मालिकेत अंशुमनने ऑफिसमधील सहकारी श्वेताचा छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. श्वेताने हा प्रकार समरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता तिला धमकी देण्यात आली. हे सर्व समजल्यानंतर स्वानंदीने श्वेताला मदत करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला अपयश आलं असलं, तरी अखेर स्वानंदीने ठोस पुराव्यासह समरसमोर सत्य मांडलं.

झी मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये राजवाडे कुटुंब एकत्र जमलेलं दिसत आहे. स्वानंदी समरला म्हणते, “ज्याला तुम्ही आदर्श भाऊ मानता, त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर येणं खूप गरजेचं आहे.” त्यानंतर ती एक व्हिडीओ दाखवते. व्हिडीओ पाहताच समरचा संताप अनावर होतो.

समर अंशुमनला जाब विचारत म्हणतो, “तुझ्यावर विश्वास ठेवला रे. एवढा विकृत वागलास तू?” यावर अंशुमन श्वेताबद्दल अपमानास्पद वक्तव्य करतो. ते ऐकताच समर अंशुमनच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो, “इतकं खोटं वागण्याची आणि नालायकपणा करण्याची तुझ्यात हिंमत कुठून येते?”प्रोमोमध्ये पुढे श्वेता तिथे येते. आजी अंशुमनला तिची माफी मागायला सांगते. अखेर खाली बसून, हात जोडून अंशुमन श्वेताची माफी मागताना दिसतो.हा प्रोमो शेअर करत झी मराठीने कॅप्शन दिलं आहे, “अखेर अंशुमनचा खरा चेहरा समोर येत श्वेताला मिळणार न्याय.”

प्रोमो पाहताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “आता मालिकेला खरा रंग आला,” “हेच पाहण्यासाठी इतके दिवस वाट पाहत होतो,” “स्वानंदी एकदम बेस्ट,” “देव पावला,” “समरने मस्त कानाखाली वाजवली,” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.दरम्यान, आता पुढे मालिकेत आणखी कोणते नाट्य घडणार, स्वानंदी-समरच्या नात्याला नवी दिशा मिळणार का, याकडे प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

12 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

16 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

16 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

16 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

16 तास ago