मुख्य बातम्या

शिरूर मध्ये ‘तुतारी’चा दणदणाट! कुमार नाणेकर यांच्या प्रचारात उसळला जनसागर; तरुणाई रस्त्यावर…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कारेगाव-कान्हूर मेसाई पंचायत समिती गटात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार अक्षय (कुमार) महाराज नाणेकर यांच्या प्रचार शुभारंभाने संपुर्ण रांजणगाव गणपती परिसर अक्षरशः ढवळून निघाला. पहिल्याच दिवशी उमेदवाराच्या प्रचारात जनसागर उसळला आणि तरुणाईने रस्त्यावर उतरुन ताकद दाखवून दिली. पंचायत समिती गटातील प्रत्येक गावातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या कुमार नाणेकर यांच्या पाठीशी उभे राहिलेले युवक-युवती हे या प्रचाराचे प्रमुख बळ ठरले आहे. विशेष म्हणजे या जनसागरात केवळ तरुणच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिक, आजोबा, निवृत्त पोलीस व लष्करी अधिकारी, व्यापारी, शेतकरी अशा समाजातील प्रत्येक घटकाचा ठळक सहभाग दिसून येत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या भव्य रॅलीने परिसर दणाणून सोडला. घोषणाबाजी, गजर, तुतारी चिन्हाचे झेंडे यामुळे प्रचार शुभारंभाला राजकीय जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. “तुतारीचा आवाज आता थांबणार नाही,” असा स्पष्ट संदेश या शक्तिप्रदर्शनातुन देण्यात आला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना कुमार नाणेकर यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, “या गटाने विधानसभेला मोठे लीड दिले आहे. जनतेचा कौल आधीच आमच्या बाजुने आहे. त्यामुळे मला कोणतीही अडचण येणार नाही.” दरम्यान, कार्यकर्त्यांना धमक्या व अडवणुकीचे प्रकार सुरु असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी विरोधकांना खणखणीत इशारा दिला.

पुढे बोलताना नाणेकर म्हणाले, “किती दिवस आमच्या कार्यकर्त्यांना आडवणार…? अशा दबावाच्या राजकारणामुळे माझ्याविषयीची सहानुभूती आणखी वाढणार आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये थेट आमने-सामने लढत, तर भाजपही मैदानात उतरल्याने निवडणुक अधिकच चुरशीची बनली आहे. तीनही बाजूंकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु असून, ही लढत शिरुर तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी व निर्णायक ठरणार, हे आता स्पष्ट होत आहे.

कारेगाव-कान्हूर मेसाई पंचायत समिती गटात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या तुतारी कुमार नाणेकरांच्या या प्रचार शुभारंभाने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून, येणाऱ्या काही दिवसांत पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण गरम झाले आहे. त्यामुळे विरोधकांनी याचा धसका घेतला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम; राष्ट्रवादीच्या तृप्ती सरोदे मात्र ‘प्रचारात’ आघाडीवर

ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना प्रचारात पतीची खंबीर साथ!

रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे शक्तीप्रदर्शन; हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

शिरूर! जिल्हा परिषद गट टाकळी हाजीत कोणता पक्ष ठरणार श्रेष्ठ …

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

16 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago